आ. अभय पाटील यांच्याकडून अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा
बेळगाव : प्रतिनिधी
दक्षिण विभागातील शहापूर येथील, हट्टीहोळी गल्लीत संजय हनावरट्टी यांच्या घरची एक भिंत रविवारी रात्री कोसळल्याने खूप नुकसान झाले आहे. नगरसेवक गिरीश धोंगडी यानी तातडीने आ.अभय पाटील याांना कल्पना दिले. आ अभय पाटील यानी आज झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांची विचारपूस करून तातडीने भरपाई देण्यासाठी सूचना करण्यात आल्या.
बेळगाव शहर आणि परिसरात मागील आठ दिवसात सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये जुन्या घरांची पडझड देखील झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नुकसानग्रस्त कुटुंबांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीने भरपाई देण्याच्या दृष्टीने त्वरित पावले उचलण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
आ अभय पाटील आणि नगरसेवक गिरीश धोंगडी यांच्या या कामाचा सर्वत्र कौतुक होत आहे आणि संजय हनावरट्टी परिवार त्यांचे आभार म्हणून समाधान व्यक्त केले.