कर्नाटकातील खासगी बस, ऑटो आणि टॅक्सी या तारखेला बंद
बेळगाव : कर्नाटक राज्यातील काँग्रेस सरकारने लागू केलेल्या महिलांना मोफत बस वाहतुकीच्या ‘शक्ती’ योजनेच्या निषेधार्थ 27 जुलै रोजी बंद पुकारण्यात आला असून ऑटो, कॅब आणि खासगी बस वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. 26 जुलैच्या मध्यरात्री 12 ते 27 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत राज्यभरात ऑटो, कॅब आणि खासगी बसेस जनतेसाठी उपलब्ध होणार नाहीत
याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना खासगी बसमालक संघटनेचे एस. नटराज शर्मा यांन माहिती दिली. राज्य सरकारच्या काही धोरणांमुळे खासगी वाहतूक तोट्यात आली आहे. याबाबत सरकारला इशारा देण्यासाठी खासगी वाहतूक वाहनांचे मालक व चालक आंदोलन करत आहेत. शासनाच्या या धोरणांमुळे ऑटो, कॅब, खासगी बसचालकांना कर्ज, विमा भरणे, जीवन जगणे कठीण होत आहे. पत्रकार परिषदेला खासगी बससह 23 संघटनांचे नेते राधाकृष्ण होला, जी. नारायण स्वामी, रघु नारायण गौडा, एम. मंजुनाथ, सदानंद स्वामी यांचा समावेश होता.