बेळगाव, खानापूर आणि कित्तूर तालुक्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी
बेळगाव :
पावसाचा जोर आज रविवारीही कायम राहिला.त्यातच गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे सुटल्याने ठिकठिकाणी झाडे व घरांची पडझड होत आहे. यात जीवितहानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले.
नद्यांसह नाल्यांच्याही पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे सोमवारी (24 जुलै) बेळगाव, खानापूर आणि कित्तूर तालुक्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (शहर आणि ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी) गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.