साईराज स्पोर्ट्स फाउंडेशन कडून श्रीनाथ दळवीचा सत्कार
बेळगाव;
साईराज स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष महेश फगरे,हे कोणता ही खेळातील खेळाडू असो ते नेहमी मदत आणि प्रोत्साहन द्यायला पुढे असतात.
राष्ट्रीय विद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत बेळगावच्या श्रीनाथ दळवीने मी. रिले स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांची चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विश्व विद्यापीठ ४x४०० मी. रिले स्पर्धेत भारतीय विद्यापीठ संघात निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल साईराज स्पोर्ट्स फाउंडेशन कडून श्रीनाथ दळवीचा खास सत्कार करून 25 हजार रुपये मदत करण्यात आला.
मंडोळी व माध्यमिक शिक्षण मंडोळी ‘हायस्कूल येथे झाले. हायस्कूलमध्ये असताना तिहेरी उडीत राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला होता. त्या यशानंतर श्रीनाथने मागे न वळता स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश संपादन करीत आहे. म्हैसूर येथे झालेल्या दसरा क्रीडा स्पर्धेत ४०० मी. धावणे व ४ x ४०० मी. रिले स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले होते. त्याचप्रमाणे बेंगळूर येथे झालेल्या कर्नाटक राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत ४०० मी. धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते.
नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत ४०० मी. धावणेमध्ये कांस्यपदक पटकाविले होते. त्याला अॅथलेटिक्स प्रशिक्षक ए. बी. शिंत्रे, उमेश बेंळगुंदकर, सुरज पाटील तर क्रीडा निर्देशक रामराव यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तो लिंगराज महाविद्यालयाचा. विद्यार्थी असून २८ जुलै दरम्यान चीनला रवाना होणार आहे. तो व्हॅक्सिन डेपो मैदानावर डायनॅमिक स्पोर्ट्सतर्फे सराव करीत आहे.
सत्कार कार्यक्रमाला साईराज स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष महेश फगरे, नगरसेवक आनंद चव्हाण, आदिनाथ गावडे, संभाजी देसाई उपस्थित होते.