राज्यातील जनतेला काँग्रेस सरकार कडून मोठा धक्का; दूध दरवाढ
बेंगळुरू : काँग्रेस सरकारने दुधाच्या दरात वाढ करून राज्यातील जनतेला मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सीएम सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली होम ऑफिस कृष्णा येथे दूध संघ आणि केएमएफच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत दुधाला प्रतिलिटर तीन रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित दर १ ऑगस्टपासून लागू होणार आहेत.
प्रतिलिटर ५ रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता. या संदर्भात आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. बैठकीत सरकारने दुधाला प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करण्याचे मान्य केले.