नगरसेवक नितीन जाधव यांची त्रिभाषा धोरणाची प्रस्ताव महापौर कडून मंजूर.
बेळगाव : प्रतिनिधी
महापालिकेत होत असलेल्या गलथान कारभाराच्या विरोधात नगरसेवक एकवटले . शुक्रवारी (दि. 21 जुलै ) महापालिकेत बैठकीचा वेळी नगरसेवक नीतीन जाधव यांनी महापौर यांच्याकडे , नोटीस आणि एजेंडा साठी त्रिभाषा धोरणाची प्रस्ताव ठेवला आणि त्यानुसार महापौर यांनीही ती मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार सर्व नगरसेवकांना जे नोटीस आणि एजेंडाचे कागदपत्रे कन्नड, इंग्रजीसह, मराठीतूनही दिले पाहिजेत असं हा प्रस्ताव आहे . मराठीतून कागदपत्रे देण्यात येत नाहीत. त्यामुळे नगरसेवक नितिन जाधव यांनी पुढाकार घेवून हे प्रस्ताव मांडला आणि सर्व नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिला.