गुजरातमधील भीषण अपघातात, 9 जणांचा मृत्यू
अहमदाबाद :
गुजरातमधील अहमदाबाद येथील इस्कॉन पुलावर झालेल्या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर या अपघातामध्ये 15 ते 20 जण जखमी असल्याचं देखील म्हटलं जात आहे. माहितीनुसार, या इस्कॉन पुलावर मध्यरात्री एक चारचाकी आणि डंपरची जोरदार धडक झाली. या अपघात पाहण्यासाठी आजूबाजूला बरीच गर्दी जमू लागली होती. तेव्हाच मागून एक गाडीने येऊन लोकांना चिरडलं.
या अपघातामध्ये आतापर्यंत नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. डंपर आणि गाडीचा अपघात झाल्यानंतर अपघाताची तपासणी करण्यासाठी पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांचा देखील या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.