उद्यमबाग आणि खानापूर रोड वरील गटार स्वच्छता
बेळगाव : प्रतिनिधी
किरकोळ पाऊस झाला तरी उद्यमबाग आणि खानापूर रोड वर पाणी तुंबून राहते. त्यामुळे लोकांचा संताप लक्षात घेत बुधवारी आ.अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ,वॉर्ड क्र.53 चे नगरसेवक रमेश मैल्यागोळ यांनी महापालिकेचा मदत ने या मार्गावरील गटार स्वच्छतेला प्रारंभ केला आहे.
या मार्गाला पावसामुळे तळ्याचे स्वरूप येत आहे. त्यामुळे वाहनधारकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होते. वारंवार असा प्रकार होत असूनही महापालिकेने लक्ष दिले नव्हते.
अखेर नगरसेवक रमेश मैल्यागोळ यांनी पुढाकार घेवून, वार्डचे आरोग्य प्रभारी गौतम गणाचारी आणि पर्यवेक्षक रमेश गोलर यांच्या मदत्तीने, आजपासून या मार्गावरील गटारींची स्वच्छता सुरू केली आहे. त्यामुळे वाहनधारकांत समाधान व्यक्त होत आहे. पावसात पाणी तुंबून राहणार नाही, याची महापालिकेने दक्षता घ्यावी .
गटार स्वच्छ केल्या बद्दल तिथल्या लोकांनी आ.अभय पाटील आणि नगरसेवक रमेश मैल्यागोळ यांचे आभार मानले.