विठोबा… भक्तांच्या दर्शनासाठी पुन्हा या..

विठोबा… भक्तांच्या दर्शनासाठी पुन्हा या..

बेळगाव-

यावेळी पावसाळा उशिराने आल्याने हिडकल जलाशय पूर्णपणे कोरडा पडला. बेळगावच्या हिडकल जलाशयात बुडालेले सर्वात जुने विठोबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध झाली होती.

हिडकल जलाशयाच्या निर्मितीच्या निमित्ताने हुन्नूर गाव पूर्णपणे स्थलांतरित करण्यात आले.या गावातील विठ्ठल देवाचे मंदिर जलाशयात बुडाले होते, मात्र यावेळी हे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध होते.गेल्या महिनाभरापासून पूरस्थिती येथे दररोज भाविकांची वर्दळ होती.

हिडकल जलाशय कोरडा पडला असला तरी विठ्ठलाच्या दर्शनामुळे हा जलाशय भक्तीच्या जलाशयाने फुलून गेला होता. आता सह्याद्रीच्या कुशीत संततधार पाऊस पडत आहे.घटप्रभा नदीची आवक बहुतांशी हिडकळ जलाशयात वाहत आहे.जलाशयातील विठ्ठलन मंदिर पुन्हा बुडत असून आज दुपारपासूनच पोलिसांचा बंदोबस्त असून भाविकांना रोखण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post बेळगांवात ही काँग्रेसची फॅमिली राजकारण.? 
Next post बेंगळुरूमध्ये पाच संशयित दहशतवाद्यांना अटक !