बेळगांवात ही काँग्रेसची फॅमिली राजकरण ?
बेळगाव-
देशात लोकसभा निवडणुकीसाठी आता आखाडे सज्ज झाले आहेत. बेळगावातही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे.मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुत्र मृणाला हेब्बाळकर यांना बेळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची जोरदार चर्चा आहे. .
बेळगावी लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून तो परत मिळविण्यासाठी काँग्रेसने प्रभावशाली नेत्याला उमेदवारी देण्याचा विचार सुरू केला आहे.
चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियंका आणि बेळगावी लोकसभा मतदारसंघातून मृणाला हेब्बाळकर या दोन प्रभावशाली उमेदवारांना रिंगणात उतरवून दोन्ही मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकविण्याची रणनीती काँग्रेस नेत्यांनी आखल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.