मंदिरामध्ये मोबाईल वापरावर बंदी
बेळगाव : प्रतिनिधी
धर्मादाय खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व देवस्थानांमध्ये मोबाईलच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातला आदेश खात्याने नुकताच बजावला आहे. कोणत्याही परिस्थितीत भाविकांनी देवस्थान परिसरात मोबाईल वापरु नये. मंदिरात जाताना मोबाईल स्विच ऑफ करावा असे आदेश देण्यात आले आहेत. मंदिरात फोनवर बोलणे, गाणी लावणे, रिल्स करणे यावरही निर्बंध आणण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून देवस्थान व्याप्तीत मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. याची दखल घेऊन खात्याचे संचालक के. पी. हेमंतराजू
यांनी यासंदर्भातला आदेश बजावला आहे. बेळगावातील श्री कपिलेश्वर मंदिर आणि हरिमंदीर यांचा यामध्ये समावेश आहे.