स्थायी समिती अध्यक्षांचे  अधिकार स्वीकृती

स्थायी समिती अध्यक्षांचे  अधिकार स्वीकृती

बेळगाव.

हद्दीच्या वादामुळे यापूर्वी बदनाम झालेल्या बेळगाव महापालिकेत जल्लोष आणि उत्सवाचे वातावरण होते.या जल्लोषाचे कारण म्हणजे, स्थायी समितीवर नियुक्त झालेल्या अध्यक्षांनी आज पदभार स्वीकारला.

महानगर महामंडळाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत चार स्थायी अध्यक्षांना खोल्या देण्यात आल्या.महापौर शोभा सोमण्णाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह नगर सेवक व संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नूतन अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.

नगररचना व विकास स्थायी समितीसाठी वाणी विलास जोशी, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण व सामाजिक न्याय स्थायी समितीसाठी रवी धोत्रे, कर आकारणी, वित्त व अपील स्थायी समितीसाठी वीणा श्रीशैला विजापुरे आणि लेखा स्थायी समितीसाठी सविता मुरुघेद्रगौडा पाटील यांची आज निवड झाली.

सर्व स्थाही समितीचे अध्यक्ष,महापालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी सक्रिय कार्यकर्त्यांची ओळख करून त्यांना महापालिकेच्या सर्व स्थायी समित्यांमध्ये जबाबदार पदांवर निवडल्याबद्दल आमदार अभय पाटील यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post सावगाव रोडवर झालेल्या अपघातातील दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू 
Next post मंदिरामध्ये मोबाईल वापरावर बंदी