कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू
कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू
सागर :
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
जटाशंकर खोऱ्याजवळ हा भीषण अपघात झाला. अपघाताच्या वेळी कारमध्ये 7 जण होते. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.