वॉर्ड क्र.48 बसवन कूडची मध्ये वॉर्ड समिती स्थापन करण्याचा निर्णय
बेळगाव महापालिका प्रभाग समिती निर्मिती आणि जनजागृतीसाठी रविवार दि.16 जुलै2023 रोजी शहरातील वॉर्ड क्र.48 मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
वॉर्ड रहिवासी समितीची माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात आणून दिल्याबद्दल येथील रहिवाशांनी अनिल चौगुले(वॉर्ड५४) आणि प्रेम चौगुला (वॉर्ड३२) यांचे आभार मानले. या कार्यक्रमात वॉर्ड 48 बसवन कुडची मधील रहिवाशांनी उपस्थिती दर्शवून प्रभाग समिती स्थापन करण्याचे एकमताने मान्य केले.कार्यक्रमा दरम्यान वॉर्ड ५४ साठी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल करत असलेल्या प्रमोद गुंजीकर यांचे येथील वॉर्ड48 बसवनकुडची चे रहिवासी श्री बसवराज कुठीवाले, श्री महेश हिरेमठ, आणि श्री यल्लाप्पा दिवटे यांनी कौतुक केले.
तसेच राणी चन्नम्मा (आरसी) नगर प्लॉट owners असोसिएशन चे अध्यक्ष प्रमोद बुद्धाजी गुंजीकर (वॉर्ड54) यांच्या अध्यक्षतेखाली शिवालय उद्यानाभोवती वृक्षरोपण करून पर्यावरण दिन विशेष पावसाळी उपक्रम कार्यक्रम यशस्वीरित्या उत्साहात संपन्न झाला.