आ.अभय पाटील यांच्या हस्ते  समृद्धी गार्डनचे उद्घाटन!

आ.अभय पाटील यांच्या हस्ते समृद्धी गार्डनचे उद्घाटन!

बेळगाव प्रतिनिधी :

रविवार दिनांक 16 जुलै 2023 रोजी दुपारी एक वाजता बेळगाव दक्षिणचे आमदार श्री अभय पाटील यांच्या हस्ते समृद्धी गार्डनचे उद्घाटन करण्यात आले.अभय पाटील यांच्या प्रयत्नाने समृद्धी कॉलनीमध्ये विविध विकास कामे झालेली आहेत. ड्रेनेज, गॅस पाईपलाईन, गटार, रस्ते या सर्व विकास कामामुळे समृद्धी कॉलनी नावाप्रमाणे समृद्ध वाटते.

उद्घाटन केल्यानंतर अभय पाटील म्हणाले की या गार्डनची काळजी घेणे हे येथील लहान थोर मंडळी बरोबरच युवकांची सुद्धा जबाबदारी आहे. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. येथील नागरिकांनी या ठिकाणी विविध सांस्कृतिक उपक्रम राबवून एकमेकांशी गुण्यागोविंदाने रहावे.

सुरुवातीला फिथ कापून उद्घाटन करण्यात आले. नंतर समृद्धी कॉलनी रहिवासी संघटनेचे अध्यक्ष श्री राजाभाऊ खन्नूकर यांच्या हस्ते आ. अभय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित नगरसेविका सारिका पाटील, नगरसेवक मंगेश पवार, अभिजीत जवळकर, श्रीशैल कांबळे, यांचा ही सत्कार ज्योती खन्नूकर, श्री गणेश सुणगार, श्री शाहू पाटील,श्रीकांत देसाई, सुरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमावेळी भरत कुमार मुरकुटे, बंडू देसाई, एस आर पाटील, मनोहर देसाई, खामकर हे उपस्थित होते. तसेच पारिजात कॉलनी, ओमकार कॉलनी, आनंदनगर येथील प्रतिष्ठित नागरिक, युवक, बालगोपाळ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एन.सी.उडकेकर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री मनोहर होनगेकर यांनी केले.

 

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post आनंद चव्हाण यांच्या पुढाकाराने अयोध्यानगर येथे नवीन इलेक्ट्रिक पॅनल 
Next post वॉर्ड क्र.48 बसवन कूडची मध्ये वॉर्ड समिती स्थापन करण्याचा निर्णय