आनंद चव्हाण यांच्या पुढाकाराने अयोध्यानगर येथे नवीन इलेक्ट्रिक पॅनल
बेळगाव:
अयोध्यानगर २ रा क्रॉस येथील बोअरवेलचा इलेक्ट्रिक पॅनेल बोर्डची अवस्था बरेच दिवसापासून फार बिकट आणि धोकादायक झाली होती. स्थानिक रहिवाशांनी बरेच दिवसापासून हा बोर्ड बदलून देण्याची मागणी केली होती. आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक आनंद चव्हाण यांनी आज येथील जुना इलेक्ट्रिक बोर्ड काढून नवीन बोर्ड बसवण्यात आला.
यावेळी स्थानिक रहिवाशांनी आमदार अभय पाटील व नगरसेवक आनंद चव्हाण यांचे विशेष आभार मानले. यावेळी भाजप युवा मोर्चा जनरल सेक्रेटरी संतोष दळवी, धनराज गवळी, प्रसाद साके, राहुल कांबळे, विजय मठपती, अमीत टीबीले, प्रकाश गवंडी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.