स्मार्ट सिटी अंतर्गत केलेले रस्त्यांचे सहा महिन्यातच दुर्दशा.
बेळगाव:
स्मार्ट सिटीच्या कामाचा तीनतेरा उडाला आहे येथील कंग्राळी खुर्द गावातील रामनगर तिसरा क्रॉस येथे स्मार्ट सिटी योजने अंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्यावर सहा महिन्यातच खड्डे पडले आहे.
त्यामुळे या मार्गावरून इजा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही गोष्ट ग्रामपंचायतच्या निदर्शनास येतात त्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बोलवून तातडीने येथील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले.
फक्त सहा महिन्यातच पावसाळ्या आधीच रस्त्याची ही दुर्दशा झाली. तर येणारा काळात काय परिस्थिती होईल असा प्रश्न गावकऱ्यांनी विचारला. तसेच रस्त्यावर खड्डे पडले असल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी येऊन येथील खड्डे बुजवली याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गौंडवाडकर, वैजनाथ बेन्नाळकर, प्रशांत पाटील, विशाल गौडवाडकर, तालीम मंडळाचे उपाध्यक्ष किरण पाटील यांच्यासह गावकरी उपस्थित होते.