सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या हुंडीत कोट्यवधी रुपयांची देणगी जमा !
सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या हुंडीत कोट्यवधी रुपयांची देणगी जमा !
बेळगाव : राज्यातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती रेणुका यल्लम्मा मंदिराची हुंडी मोजणी पूर्ण झाली असून यावेळी मोठ्या प्रमाणात देणगी जमा झाली आहे.
17 मे ते 30 जून या 45 दिवसांत मंदिरात 1.37 कोटी रुपयांची देणगी जमा झाली. मंदिराच्या हुंडीत 1 कोटी 30 लाख 42 हजार रुपये रोख, 4.44 लाख किमतीचे सोने, 2.29 लाख किमतीचे चांदीचे दागिने जमा झाले आहेत.