नितीन जाधव यांच्या पुढाकाराने साई मंदीर जवळील पथदीप प्रज्वलित
बेळगाव:
पहली रेल्वे गेट, टिळकवाडी,येथील साई मंदीर जवळील रस्त्यावर पथदीप बसविण्यात आले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते पथदीप बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी पादचार्यांसह वाहनचालकांना अंधारातून ये-जा करावी लागत होते.गेल्या बरेच दिवसापासून बंद अवस्थेत होते.
तेथील मंदीर चे ट्रस्टी व स्थानिक रहिवाशांनी नगरसेवक नितीन जाधव यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देताच नगरसेवक नितीन जाधव यांनी आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित पुढाकार घेवून पथदीप चालू केले. याबद्दल साई मंदीर चे ट्रस्टी , शशांक किनेकर व लक्ष्मी घोडके यांनी आमदार अभय पाटील व नगरसेवक नितीन जाधव यांचे विशेष आभार मानले.