मुलीचे अपहरण प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक
मुलीचे अपहरण प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक
बेळगाव :
हिंदवाडी येथील महावीर उद्यान जवळ एका मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आहे.
मुलीच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर सीपीआय दयानंद शेगुणाशी यांच्या देखरेखीखाली टिळकवाडी पोलिसांनी सर्व माहिती जमा करून मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात यश मिळविले. बेळगाव मारुती नगर येथील रहिवासी ३५ वर्षीय गजानन पाटील असे या व्यक्तीचे नाव आहे.