
पोलीस आयुक्तपदी एस. एन. सिद्दरामप्पा यांची नियुक्ती
पोलीस आयुक्तपदी एस. एन. सिद्दरामप्पा यांची नियुक्ती
बेळगाव : प्रतिनिधी
बेळगावच्या नूतन पोलीस आयुक्तपदी एस. एन. सिद्दरामप्पा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी डॉ. बोरलिंगय्या यांनी आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या बदलीनंतर काही काळासाठी हे पद रिक्त होते. त्यांच्या जागी आता सिद्दरामप्पा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सन २००५ सालच्या बॅचचे अधिकारी आहेत. ते लवकरच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले