लग्नाच्या वाड्यांची बसच्या भीषण अपघातात १२ मृत्यु.

लग्नाच्या वाड्यांची बसच्या भीषण अपघातात १२ मृत्यु.

बुलडाणा:

महाराष्ट्रातील बुलढाणा अपघातानंतर आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात देखील एक भीषण अपघात झाला आहे. दर्शनीजवळ लग्नाच्या वऱ्हाडांनी भरलेली बस अनियंत्रित होऊन सागल कालव्यात पडली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या भीषण दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण जखमी देखील झाले आहेत. या अपघाताच्या वेळी बसमध्ये ३५ ते ४० जण प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या रिसेप्शनसाठी काकीनाडा येथे जाण्यासाठी लग्नाच्या मंडळींनी आरटीसी बस भाड्याने घेतली होती. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्दैवाने या मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post अमरनाथ यात्रेतील बेळगावचे 35 यात्रेकरू सुखरूप
Next post जैन मुनींच्या हत्येमागे जिहादी: विहिंपचा संशय.