अमरनाथ यात्रेतील बेळगावचे 35 यात्रेकरू सुखरूप
बेळगाव :
बेळगावहून अमरनाथ यात्रेला गेलेले 35 यात्रेकरु परतीच्या प्रवासात जम्मू-काश्मीर (अनंतनाग ) जवळ तीन दिवसांपासून अडकलो आहेत. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. सर्वजण सुरक्षित असून भारतीय सैन्य दलाकडून (BSF) कॅम्पमध्ये त्यांची सोय केली आहे. दरवर्षी बेळगावमधून भाविक अमरनाथ यात्रेला जातात. बेळगावातून 28 जूनला यात्रेकरु निघाले होते. सहाजुलैला त्यांचे दर्शन झाले. दर्शन घेऊन परतत असताना जोरदार पाऊस सुरु झाला. त्यामुळे ते अडकले. बेळगावहून 35 जणांची तुकडी यात्रेला गेली होती. यात्रेच्या मार्गावरील पूल कोसळल्याने अमरनाथ यात्रेला गेलेले हजारो यात्रेकरु अडकले आहेत. त्यात बेळगावहून गेलेले 25 पुरुष आणि 10 महिलांची तुकडी
अनंतनाग सारख्या संवेदनशील ठिकाणी अडकली आहेत. सर्वजण सुरक्षित असून बेस कॅम्पमध्ये जेवण आणि राहण्याची सोय भारतीय सैन्य दलाकडून केली जात आहे.