बेळगाव शहरातील सर्व मालमत्तांची डिजिटल नोंद
बेळगाव :
बेळगाव शहरातील सर्व मालमत्तांची डिजिटल नोंद करण्यात येणार आहे. प्रत्येक महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्तांची डिजिटल नोंद केली जाणार आहे. त्याबाबत बेळगावमध्ये महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्यावतीने जनजागृती करण्यात आली आहे. सध्या सर्व नोंदी संगणकीय केल्या जात आहेत.मालमत्ता डिजिटल नोंद करण्यासाठी सदर मालमत्तेचे छायाचित्र, मालमत्ता मालकांचे छायाचित्र, ओळखपत्र त्यामध्ये मतदार ओळखपत्र,पॅनकार्ड, रेशनकार्ड व इतर ओळखपत्र असलेले कोणतेही कार्ड आवश्यक आहे.
सदर मालमत्तांची मालकी सिद्ध करण्यासाठी सेलडीड, सीटीएस उतारा, एनए लेआऊट, बक्षीसपत्र किंवा न्यायालयाचा निकाल याबाबतची कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. या कागदपत्रांबरोबरच वीजबिल, मालमत्ता भरलेली नूतन पावती, पाणीबिल, बांधकाम परवानगीपत्र देणे बंधनकारक आहे. ही सर्व कागदपत्रे दक्षिण विभाग महसूल कार्यालय, पहिला मजला, गोवावेस, बेळगाव येथे जमा करावीत, असे या जनजागृती पत्रकामध्ये म्हटले आहे.