जैन मुनींच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवा : आ.अभय पाटील
बेळगाव
चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी येथील जैन मुनी कमकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी भाजपचे आमदार अभय पाटील यांनी सरकारकडे केली आहे.
आज रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, मुनींबाबत चुकीची माहिती देऊन जनतेला चुकीचा संदेश देण्याचे काम पोलिस विभाग करत आहे.
याप्रकरणी राज्यातील काँग्रेस सरकार ऋषीमुनी आणि जैन समाजाला कलंकित करण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले.जैन मुनींनी आर्थिक व्यवहार केल्याचे वक्तव्य पोलिसांनी माध्यमांसमोर केले आहे.
सरकार जैन समाजाचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार अभय पाटील यांनी केली.सध्याच्या प्रकरणाचा तपास त्यांना संशयास्पद वाटत आहे.त्यामुळे ते सीबीआयवर सोपवावा जेणेकरून तपास पारदर्शकपणे व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.