नगरसेवक नितीन जाधव यांच्या कडून कु. स्नेहल कणबर्गी हिचा सत्कार.
बेळगाव:
वॉर्ड 29 चे नगरसेवक नितीन जाधव यांनी हट्टीहोळी गल्ली ,शहापूर ,येथील श्री सुंदर कणबर्गी या ऑटो चालकाची कन्या , कु. स्नेहल सुंदर कणबर्गी , हिचा BE मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार केले.
कन्नड माध्यमाच्या सरकारी सरस्वती गर्ल्स हायस्कूलमधून 98.24% गुणांसह एसएसएलसी बेळगावात प्रथम तसेच E&C डिप्लोमा मध्ये विभागात प्रथम आली.तिने DCET मध्ये 59 वा रँक मिळवला आणि नंतर GIT मधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.
नगरसेवक नितीन जाधव म्हणाले की, स्नेहल कणबर्गीचा सत्कार करताना मला आनंद होतो आणि अभिमान वाटतो. तरुण पिढीने तिच्या कामगिरीने प्रेरित होऊन तिला आदर्श मानायला हवे असे सांगितले.तिच्या कॅम्पस निवडीबद्दल त्यांनी तिचे अभिनंदन केले आणि तिच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
नगरसेवक नितीन जाधव यांनी प्रसन्नकुमार लाठे, किरण बेकवाड, प्रफुल्ल सुलधाळ, तुकाराम आमशी, रवी मग्गवी, मनोज केरवाडकर, मंजुनाथ हिरेमठ, गजानन नाकाडी आणि मृत्युंजय उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले.