जैन मुनींची हत्या, संतापाची लाट, महामार्गावर रास्ता रोको
बेळगाव :
चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी येथील नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी १०८ कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचा निषेधार्थ बेळगावात आज जैन समाजबांधवांनी उग्र आंदोलन केले. सुवर्ण विधानसौध समोर पुणे-बंगळुरू ४ राष्ट्रीय महामार्गावर रोको करून आंदोलन करून जैन मुनी, स्वामीजींना संरक्षण देण्याची मागणी केली.
हलगा गावचे सिद्धसेन महाराज यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आबालवृद्धांसह जैन समाजाचे नेते आणि हजारो लोक सहभागी झाले होते. जैन धर्माचे ध्वज हाती घेऊन आंदोलकानी जोरदार घोषणाबाजी करत जैन मुनींच्या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध केला. अहिंसा परमोधर्म की जय, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलक संतप्त झाले.