नगरसेवक अभ्यास दौरा स्वखर्चाने करणार: आ.अभय पाटील
नगरसेवक अभ्यास दौरा स्वखर्चाने करणार: आ.अभय पाटील
बेळगाव:
शुक्रवारी 7 जुलै रोजी स्थायी समिती निवडणूक झाल्यानंतर तेआ.अभय पाटील यानी सांगितलेे की बेळगावचे नगरसेवक लवकरच अभ्यास दौरा करणार आहेत. सुुरत , इंदूर सारख्या महापालिकांनी अनेक चांगले प्रकल्प राबवले आहेत.
या प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी लवकरच नगरसेवक अभ्यास दौरा करणार आहेत. या दौऱ्यातून बेळगावात चांगली विकासकामे राबवता येतील. पण, हा अभ्यास दौरा महापालिकेच्या खर्चातून होणार नाही. तर नगरसेवक स्वतःच्या खर्चाने दौऱ्यात सहभागी होणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.