क्रेडाई महिला विंग कडून बांधकाम कामगारांना स्टील वॉटर बॉटल वाटप
बेळगाव:
क्रेडाई महिला विंगने 8 जुलै रोजी स्टील वॉटर बॉटल वाटप मोहिमेचे आयोजन केले होते, ज्याचे नेतृत्व शहर समन्वयक दीपा वांडकर आणि सचिव करुणा हिरेमठ यांनी केले होते.
क्रेडाईच्या “गो ग्रीन” थीमला प्रोत्साहन देणे आणि बांधकाम कामगारांना स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या देऊन त्यांचा प्लास्टिकचा वापर कमी करण्यास प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.यशस्वी वृक्षारोपण मोहिमेनंतर ही वितरण मोहीम शाश्वत वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने त्यांचे दुसरे पाऊल आहे.
आज भाग्यनगर येथील अभिजीत जवळकर यांच्या “अंबिका प्लॅटिनम प्रोजेक्ट” येथील कामगारांना स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या देण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरवातीला अभिजीत जवळकर यांनी क्रेडाई महिला विंगच्या सदस्यांना पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
क्रेडाई महिला विंगच्या शहर समन्वयक दीपा वांडकर यांनी कामगारांना प्लास्टिक वापर करण्यामुळे त्यांचा आरोग्य आणि पर्यावरणाचा किती आणि कशा पद्धतीने नुकसान होते हे सांगीतले. त्यानंतर सर्व कामगारांना स्टील बॉटल वाटप केले.
कार्यक्रमाच्या समन्वयक अनुराधा नाईक, चिन्मय बैलवाड, सारिका नाईक यांनी वितरणाचे नियोजन निर्विघ्नपणे केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रेडाई महिला विंगच्या अपर्णा गोजगेकर, सायली अल्नोजी, नीतू जवळकर, संज्योत पानारे, अमृता अकनोजी आणि नुरिया शेख उपस्थित होत्या.