अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी दोषीला 20 वर्षांची शिक्षा
अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी दोषीला 20 वर्षांची शिक्षा
चामराजनगर :
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला चामराजनगर न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. चामराजनगर कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे बालस्नेही न्यायाधीश एसी निशाराणी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दोषीला 20 वर्षे तुरुंगवास आणि 40,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या 21 वर्षीय रंगास्वामीला आता तुरुंगात टाकण्यात आले आहे.तसेच पीडित मुलीला चार लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.