चंपाबाई भोगले शाळेत प्लास्टिक बंदी आणि स्वच्छ्ता जागरूकता मोहीम.
बेळगाव : प्रतिनिधी
आ.अभय पाटील यांच्या मार्गदरशनाखाली, नगरसेवक गिरीश धोंगडी यांच्या पुढाकाराने मागील काही दिवसांपासून बंद पडलेली प्लास्टिक विरोधी मोहीम पुन्हा गतिमान करण्यात आली आहे. प्लास्टिक बंदी मोहिमेंतर्गत महापालिकेच्यावतीने सोमवारी वॉर्ड क्र.24 येथील खडेबाजार,दाने गल्ली व विविध ठिकाणी कारवाई केली होती.
त्याचप्रमाणे यावेळी शाळेतल्या मुलांना ही प्लास्टिक वापरन्याने काय हानी होऊ शकते हे सगण्यात यावे म्हणून नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी पुढाकाराने कोरे गल्ली येथील चंपाबाई भोगले शाळेच्या चैरपरसन श्रुती मॅडम ना भेटूले.
त्यांनी परवानगी दिल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्लास्टिक वापरल्यामुळे काय होतो ह्या विषयावर माहिती दिली तसेच आपल्या आजू बाजू चे परिसर स्वच्छ कसा ठेवायचं ह्या बद्दल ही विद्यार्थांना जागृत केले.या उपक्रमाला शाळेतील सर्व शाळेतील मुल,शिक्षक वर्ग,कर्मचारी,महापालिकेचे स्वच्छता पर्यवेक्षक कलावती मॅडम उपस्थित होते .
नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी श्रुती मॅडमचे आणि शाळेतील सर्व शिक्षक वर्ग यांची आभार मानले.