हेस्कॉमकडून व्यापारी, उद्योजकांसाठी विशेष कार्यशाळा
बेळगाव
हेस्कॉमकडून व्यापारी आणि उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांबाबत गुरुवारी विशेष कार्यशाळा पार पडली. उद्यमबाग येथील चेंबर ऑफ कॉमर्सच्या
सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत हेस्कॉमचे वरिष्ठ अधिकारी व चेंबर ऑफ
कॉमर्सचे पदाधिकारी उपस्थित होते. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज, लघु उद्योजक संघटना, मायक्रो इंडस्ट्री असोसिएशन, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाऊंड्रीमन आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा यामध्ये सहभाग होता. हेस्कॉमचे व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद रोषन यांनी हेस्कॉमच्या योजनांबद्दल माहिती
दिली. यावेळी वित्त विभागाचे संचालक प्रकाश पाटील, मुख्य अभियंता व्ही. प्रकाश
, नियंत्रणाधिकारी एस. ए. सिंधुर,चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल, लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष महादेव चौगुले, प्रभाकर नागरमुन्नोळी, सचिव स्वप्नील शहा, आनंद देसाई, संजय पोतदार, रमेश देसूरकर, आदि उपस्थित होते.