वॉर्ड क्रमंक 42 आणि 43 येथील मनपा सफाई कामगारांना रेनकोट आणि हॅण्ड ग्लोव्हज वाटप.
वॉर्ड क्रमंक 42 आणि 43 येथील मनपा सफाई कामगारांना रेनकोट आणि हॅण्ड ग्लोव्हज वाटप.
बेळगाव:
वॉर्ड क्रमंक 42 आणि 43 येथील सफाई कामगारांना आज बुधवार दि.5 जुलै रोजी गणपती मंदिर जवळील मनपाची बीट ऑफिस येथे रेनकोट आणि हॅण्ड ग्लोव्हज देण्यात आले.तसेच त्यांना डेंग्यू आणि चिकन गूनिया लस ची डोस ही देण्यात आले.
या कार्यक्रमात वॉर्ड क्रमंक 42 चे नगरसेवक अभिजीत जवळकर आणि वॉर्ड क्रमंक 43 चे नगरसेविका सौ.वणी जोशी ह्यांच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला मनपा चे कर्मचारी, कामगार वर्ग आणि इतर प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.