नगरसेविका सौ.नेत्रावती विनोद भागवत यांच्या वॉर्ड क्र. 15 येथे डेंग्यू चिकन गुनिया लस घरो घरी 

नगरसेविका सौ.नेत्रावती विनोद भागवत यांच्या वॉर्ड क्र. 15 येथे डेंग्यू चिकन गुनिया लस घरो घरी

बेळगाव:

माननीय आमदार अभय पाटील साहेब यांच्या नेतत्वाखाली. व नगरसेविका सौ.नेत्रावती विनोद भागवत यांच्या पुढाकाराने वॉर्ड क्रमांक 15 येथे डेंग्यू चिकन गुनिया लस घरो घरी जाऊन देण्यात आले.

बेळगांव मध्ये डेंग्यू ची साथ सुरू होण्या पूर्वी खबरदारी म्हणून नगरसेविका सौ.नेत्रावती विनोद भागवत यांनी पुढाकार घेवून हे उपक्रम आ.अभय पाटील यांच्या मार्गदर्शनखाली रविवारी 2 जुलै सकाळी 9 वा.सुरू केले आणि हे उपक्रम पूर्ण अठवडा रबिवणार आहेत असे नगरसेविका सौ.नेत्रावती विनोद भागवत यांनी माहीती दिली.

वॉर्ड मधील सर्व लोकांना या उपक्रमअंतर्गत घरापर्यंत जावून ही लस देण्यात येईल आणि सुमारे 8 ते 10 हजारांहून अधिक लोकांना याचा लाभ होईल असे त्यानी सांगितले. ह्या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि आ.अभय पाटील आणि नगरसेविका सौ.नेत्रावती विनोद भागवत व त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमारच्या कारला भीषण अपघात
Next post तहसीलदार मन्निकेरी मृत्यू प्रकरणात नाविन खुलासा : मृत्युपत्र पोलिसांचा हाती.