आज निपाणीत शिवरायांच्या पवित्र पादुकांचे आगमन
निपाणी:
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिव्य पादुकांचे किल्ले शिवनेरीवरून प्रस्थान झाले आहे. या सोहळ्याचे हे 9 वर्ष असून परंपराने 29 वे वर्षे चालू आहे निपाणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिव्या पादुकांचे श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठाचे मठाधीश परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांच्या प्रयत्नाने यावर्षी ही शिवभक्तांना शिवरायांच्या दिव्य पादुकांचे यावर्षीही दर्शनाचे भाग्य मिळणार आहे.
या पादुकांचे आगमन उद्या बुधवार दिनांक 5 जुलै रोजी होणार आहे. या पालखी सोहळ्याचे समन्वय डॉ. संदीप महिंद गुरुजी यांच्यासह शिवभक्त यासाठी नियोजन करीत आहेत निपाणी मधील परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी आणि निपाणी येथील सर्व शिवभक्त यांच्या माध्यमातून हे नियोजन निपाणी नगरीत करीत आहेत.
उद्या बुधवार दिनांक 5 जुलै रोजी सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी लढवलेली नेसरीची खिंड येथून निपाणी नगरीमध्ये शिव तीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक निपाणी येथे पादुकाचे आगमन होणार आहे तेथून हा पालखी सोहळा तानाजी चौक, कोटीवाले कॉर्नर, कित्तूर राणी चन्नम्मा चौक, धर्मवीर संभाजीराजे चौक, (बस स्टँड) निपाणी येथे या पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे.
हा पालखी सोहळा निपाणी परिसरासह ग्रामीण भागामधून हरे कृष्णा इस्कॉनचे भक्त, सोंदलगा, शिरगुप्पी, श्रीपेवाडी, कोडणी, भिवशी, बुधलमुख,पांगीर, बुदिहाल, अर्जुनी, रामपूर, चिखलवाळ, यमगरणी, गायकवाड, तवंदी, जत्राट, पडलिहाल, लखमापूर, शेंदूर, येथून भजनी मंडळ या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत हा पालखी सोहळा हा टाळ मृदुंगच्या गजरात निघणार आहे आणि फिरंगोजी शिंदे सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संचलित मर्दानी आखाडा सैनिक गिरगाव कोल्हापूर यांची मर्दानी खेळाची प्रातेक्षिक या पालखी सोहळ्यामध्ये दाखवण्यात येणार आहे, अशी माहित समाधी मठाचे सागर श्रीखंडे यांनी दिली.