बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी पदी ए. बी.पुंडलिक यांची नियुक्ती.
बंगळुरू :
राज्य सरकारने अनेक शिक्षण अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश जारी केले आहेत.ए. बी. पुंडलिक यांची बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंड्यासाठी शिवरामेगौडा, विजयपूरसाठी एनएच नागोर, बागलकोटसाठी दोड्डुबसप्पा निरळेकर, जवरेगौडा यांची हसन येथे जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. युवराज नायक यांची धारवाड डाएट प्रिन्सिपल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबरोबर अनेक क्षेत्रीय शिक्षण अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या आहेत.
बेळगावचे क्षेत्रशिक्षण अधिकारी वाय. जे. बजंत्री यांची खानापूर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी विद्या कुंदरगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महादेवी अप्पाजी यांची निप्पाणी येथे, अदापूर रामण्णा संगप्पा बेळगी, इमाम साबा अक्की संदूर, रवींद्र बळीगार बेलागाव येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात बदली झाली आहे.