ऑटो आणि लॉरीमध्ये भीषण अपघात : सात ठार
विजयनगर :
विजयनगर जिल्ह्यातील होस्पेट तालुक्यातील वडरहळ्ळी पुलाजवळ दोन ऑटो आणि लॉरी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच महिलांसह सात प्रवाशांचा मृत्यू झाला. तर दोन मुलांसह आठ जण जखमी झाले असून त्यांना विम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेvआहे. बेळ्ळारी येथून दोन ऑटोतून १९ जण तुंगभद्रा धरणाकडे जात असताना हा अपघात झाला. हॉस्पेट ग्रामीण स्टेशन पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यास्मिन, झहीरा, शाम, काशीम तसेच ऑटोचालक उमेश आणि श्याम अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अन्य दोघांची नावे समजू शकले नाहीत. आमदार गवियप्पा, एसपी श्रीहरिबाबू, एसी सिद्धरामेश्वर यांनी होस्पेट येथील सरकारी रुग्णालयात भेट दिली.