मंगाई जत्रेच्या तैयारीची आ.अभय पाटील यांच्याकडून पाहाणी
बेळगाव:
वडगाव येथील श्री मंगाई देवीचा यात्रा उत्सव दि. 11 जुलै रोजी होणार आहे. या निमित्ताने या ठिकाणी असणाऱ्या विविध नागरी सुविधांच्या पूर्ततेसाठी विशेष पावले उचलण्यात आली आहेत . बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी यात्रोत्सवाच्या कालावधीत कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी गुुरूवारी पाहणी करण्यात आली. पाहणी करून आवश्यक सुविधांची उपलब्धता करून देण्याचे आश्वासन दिले.
आ.अभय पाटील यांनी जत्रे निम्मित तय्यारीचे कामांची अडावा घेतले, देवळाच्या कमिटी बरोबर चर्चा करून , कंत्रादारांना निर्देशन दिले आणि 11 जुलै चा आत काम पूर्ण करण्यास सांगीतले.
देवळाच्या कमिटी कडून आ.अभय पाटील यांच्या कामाचा कौतुक आणि आभार मान्यात आले आणि आ.अभय पाटील यांचा सत्कार करण्यात आले.
सदर कामाच्या संदर्भात नगरसेविका सारिका पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पिळणकर यांनी मंगाई भक्तांच्या वतीने आ. अभय पाटील यांचे आभार मानले.