खासगी बस उलटली, चालकासह दोन जण मृत्यू,
हावेरी : हावेरी जिल्ह्यातील बडागी तालुक्यातील मोटेबेन्नूर गावाजवळ आज (दि. 29) सकाळी खासगी बस उलटून चालकासह दोघांचा मृत्यू झाला.बेंगळुरूहून मीरजच्या दिशेने एक खासगी गाडी जात होती ही बस बडगी तालुक्यातील मोटेबेन्नूर गाव जवळ चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुभाजकाला धडकून बस उलटली.
बस उलटल्याने बसचालक सदानंद (५०) आणि बेळगाव येथील प्रवासी राहुल (२२) यांचा मृत्यू झाला.तसेच अनेक प्रवासी अपघातात जखमी झाले.
अपघातामुळे बसच्या काचेचा चक्काचूर झाला बसमध्ये चिरडलेला आणि अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना धडपड करावी लागली.मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.