राज्य सरकारकडून महत्त्वाचे घोषणा; तांदुळ ऐवजी पैसे देण्याचा निर्णय
राज्य सरकारने अन्नभाग्य गॅरंटी अंतर्गत 5 किलो तांदळाच्या बदल्यात पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. मुखमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना अन्नमंत्री के .एच मुनियप्पा म्हणाले की, लोकांना तांदूळऐवजी पैसे दिला जाईल.हे पैसे देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने अतिरिक्त तांदूळ देण्यास नकार दिल्याने तांदळाचा तुटवडा निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना 5 किलो तांदळाऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ते म्हणाले की, जुलैपासूनच 34 रुपये प्रति किलो दराने पैसे खात्यात जमा केले जातील.म्हणजेच प्रत्येक रेशनधारकाच्या खात्यात 5 किलो तांदळाऐवजी 170 रुपये दिले जातील.तांदूळ मिळेपर्यंत आम्ही पैसे देतो.तांदूळ मिळाल्यानंतर 10 किलो तांदूळ वाटप केले जाईल असे सांगितले.