खानापूरात युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

खानापूरात युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

खानापूर :

खानापूर शहराला लागून असलेल्या शिवाजी नगरात सततच्या आजाराला कंटाळून राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. सदर दुर्दैवी युवतीची नाव रोहिणी रामचंद्र चोपडे (वय २३) असून रविवारी दि. २५ रोजी दुपारी घरी नसल्याचे पाहून त्या युवतीने घरात आत्महत्या केली. आई शेतीला गेली होती. तर भाऊ कामावर गेला होता. सायंकाळी कामावरून भाऊ घरी आला असता रोहिणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसुन आला. रोहिणीच्या आत्महत्येची बातमी समजताच परिसरात हळहळ होत होती. लागलीच खानापूर पोलिसाना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर शवविच्छेदनासाठी युवतीची मृतदेह सरकारी दवाखान्यात आणुन शल्यविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद खानापूर पोलीस स्टेशनात झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. रोहिणीचे बीकॉम पर्यंतचे शिक्षण झाले असून ती खानापूरात मेडीकल शाप मध्ये काम करत होती. तिच्या अचानक जाण्याने कुटुंबावर संकट कोसळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post गंजम जिल्ह्यात भीषण अपघात 10 मृत्यू;8 लोकांसाठी गंभीर इजा
Next post मानव अधिकार आणि भ्रष्टाचार विरोधी फोरमचे महापालिका आयुक्तांना निवेदन