गंजम जिल्ह्यात भीषण अपघात 10 मृत्यू;8 लोकांसाठी गंभीर इजा
ओडिशा :
ओडिशा गंजम जिल्ह्यात रात्री एक भीषण अपघात झाला. यामध्ये १० लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर आठ अन्य जण जखमी झालेल्यांना बरहमपूरच्या एमकेसीजी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. विशेष मदत आयुक्तांनी ही माहिती दिली आहे.
गंजमच्या डीएम दिव्या ज्योती परिदा यांनी सांगितले की, दोन बसेसची टक्कर झाली. ज्यात १० जणांचा मृत्यू झाला. जखमींना तात्काळ एमकेसीजी मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आम्ही जखमींना शक्य ती सर्व मदत देण्याचा प्रयत्न करत आहोत.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गंजम जिल्ह्यातील बस दुर्घटनेतील लोकांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे आणि ३ लाखाची मदत जाहिर केली आहे.