भाग्यलक्ष्मी महिला संघाचे फलकाचा अनावरण
बेळगाव:
भाग्यलक्ष्मी महिला संघ फलकाचे अनावरण खासबाग बेळगाव दि : बाडीवाले कॉलनी (टिचर्स कॉलनी) र बेळगाव येथील भाग्यलक्ष्मी महिला संघ फलकाचे अनावरण नुकतेच श्रीधून जयेश भातकांडे, समाज सेवक व फलकाचे देणगिदार, यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी श्री विजय साखळकर यानी उपस्थितांचे स्वागत केले. महिला संघाच्या अध्यक्षासौ स्मीता अनगोळकर व उपाध्यक्षा सौ संगिता बाडिवाले यानी मान्यवरांना पुष्पगुच्छ 1 देवून त्यांचा सत्कार केला.
यावेळी श्री जयेश भांतकांडे यानी महिला संघाच्या सदस्याना उद्देश्न मार्गदर्शनपर आपले विचार प्रगट करून भविष्यात सर्वतोपरि मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांना शाल व श्रीफळ देवून त्यांचा संघातर्फे सत्कार देखील करण्यात आला.
यावेळी श्री. रमेश देसूरकर यानी देखील महिलांना उद्देशून आपले विचार प्रकट केले यावेळी टिचर्स कॉलनीतील मान्यवर व्यक्ती लालू बाडिवाले श्री सुळेभावी, श्वरेकर, श्री तावरे, सौ शिल्पा हितलकेरसौ पुष्पा कणबरकर श्री प्रकाश पाटील संतोष श्रींगारी सूर्यकांत हिंडलगेकर विशाल सैनूचे अजित बांदेकर इत्यादी उपस्थित होते.