बी. एस.लोकेश कुमार यांची बेळगाव उत्तर विभाग आयजीपी पदी नियुक्ती.
बेळगाव : बेळगावचे माजी पोलीस आयुक्त बी. एस.लोकेश कुमार यांची आता बेळगाव उत्तर विभाग आयजीपी अर्थात पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या पदावर असलेल्या आणि परिश्रमपूर्वक उत्तर विभाग सांभाळलेल्या आयजीपी एन.सतीश कुमार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
बेळ्ळारी येथून बी. एस. लोकेश कुमार (केएन – 2005) यांची बेळगावचे आयजीपी म्हणून तातडीने नियुक्ती केली गेली आहे. साधी राहणी आणि लोकांची मैत्रीपूर्ण संबंध ठेवणाऱ्या नूतन आयजीपी लोकेश कुमार यांच्या नियुक्तीचे बेळगाव परिसरात स्वागत होत आहे. हुबळी धारवाड शहराचे पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस आयुक्त असलेले रमण गुप्ता यांची बदली बेळगाव उत्तर विभाग पोलीस महानिरीक्षक पदी करण्यात आली होती.