बेळगावचे पोलीस आयुक्त आणि आयजीपींची बदली!

बेळगावचे पोलीस आयुक्त आणि आयजीपींची बदली!

बेळगाव :

बेळगाव शहर आयुक्त कार्यालयाचे पोलीस आयुक्त डॉ.एम बी बोरलिंगय्या आणि बेळगावचे आयजीपी सतीश कुमार यांची बदली करण्यात आली आहे.

डॉ.बोरलिंगय्या यांची म्हैसूर झोन डीजीपी पदावर बदली करण्यात आली आहे.त्यांनी 1 जानेवारी 2022 रोजी बेळगावचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता.

एक कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांनी कोणत्याही राजकारण्याला न घाबरता,निःस्वार्थपणे सेवा दिली आणि एक वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.

बेळगाव झोनचे आयजीपी सतीश कुमार हुबळी-धारवाडचे आयजीपी रमण गुप्ता यांची बंगळुरू शहर पश्चिम विभागात बदली करून त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post  जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पिण्याच्या पाण्यासाठी घेतली टास्क फोर्सची बैठक,
Next post बी. एस.लोकेश कुमार यांची बेळगाव उत्तर विभाग आयजीपी पदी नियुक्ती.