जयंत जाधव यांच्या पुढाकाराने वॉर्ड क्र.23 मध्ये स्वच्छता अभियान
बेळगाव : प्रतिनिधी
वॉर्ड क्र. 23 येथे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. मनपा यंत्रणेचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असल्याची तक्रार होत होती. त्यामुळे येथील नागरिकांची मोठी कुचंबणा होत होती. अस्वच्छतेमुळे दुर्गंधी आणि डास यांचा सामना करावा लागत होता.याची दखल घेण्याची मागणी नागरिकांनी जयंत जाधव यांच्याकडे केली होती.
नगरसेवक जयंत जाधव यांनी आ.अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वच्छता अभियान टीमच्या मदतीने, नार्वेकर गल्ली ,आचार गल्ली ,बिच़ू गल्ली, जेड गल्ली ,मेलगे गल्ली ,भोज गल्ली, तेली पाटील गल्ली, विठ्ठल देव गल्ली, होसुर मठ गल्ली, भेंडवाड गल्ली आणि खडे बाजार शहापूर येथे स्वच्छ्ता अभियान रविवारी सकाळी राबविण्यात आले.
या कार्यासाठी नागरिकांनी नगरसेवक जयंत जाधव आणि आ.अभय पाटील यांचे कौतुक केले आणि आभार मानले.या अभियानात नगरसेवक जयंत जाधव व नितीन जाधव यांच्या सोबत इतर कार्यकर्ते उपस्थित होते.