लोकसभा निवडणुकीसठी बेळगाव मतदारसंघातून भाजपचे तिकीट कोणाला?
बेळगाव;
बेळगाव लोकसभा निवडणुकीसठी भाजपचे तिकीट मिळविण्यासाठी माजी आमदार अनिल बेनके, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवठगीमठ , एम. बी. जिरली, मुरगेंद्रगौडा पाटील,माजी आमदार संजय पाटील प्रयत्न करत असल्याचं माहीत मिळाली आहे.
जगदीश शेट्टर यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मंगला अंगडी यांना यावेळी बेळगाव मतदारसंघातून भाजपचे तिकीट मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत .एकूणच यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी बेळगावात आखाडे सज्ज झाले असून, तिकीट कोणाला मिळणार हे स्पष्टपणे सांगणे कठीण असताना सूत्रांकडून कळते की भाजप कडून एक नवीन चेहरा उभा करण्याची शक्यता आहे .
बेळगाव येथील एक नामी उद्योगपतींचा नाव पुढे येत आहे आणि तो तिकिट साठी प्रयत्न ही करु शकतो.त्या उद्योगपतीला दोनदा प्रस्ताव आला होता पण त्यांनी ते वयक्तिक कारणामुळे स्वीकार केले नव्हत.आत्ता या तिकीट मिळवण्याचा रेस मध्ये नवीन चेहरा जिंकतो की काय हे बघायचा आहे.