स्काय अव्हेन्यू रस्त्यावरील पथदीप व्यवस्थेसाठी नगरसेवक आनंद चव्हाण यांचा पुढाकार.
बेळगाव : प्रतिनिधी
वॉर्ड क्र.44 येथील,स्काय अव्हेन्यू रस्त्यावरील पथदीप व्यवस्था कोलमडली होती. येथील नागरिकांनी याबाबत मनपा यंत्रणेला सूचना केल्या होत्या. मात्र, त्याची दखल घेण्यात आलेली नव्हती. येथील नागरिकांनी नगरसेवक आनंद चव्हाण यांना याची कल्पना दिल्यानंतर ,त्यांनी तातडीने आ. अभय पाटील यांच्या निर्देशनास आणून दिले.
आ.अभय पाटील यांच्या मार्गदर्शाखाली स्काय अव्हेन्यू रस्त्यावरील पथदीप व्यवस्था सुधारण्यासाठी पावले उचलली. पथदीप व्यवस्था करण्यासाठी त्यांनी मनपा यंत्रणेला पाचारण केले. तसेच तातडीने जुने पथदीप बदलून नवीन बसवण्याची सूचना केली. त्यामुळे या समस्येचे निवारण झाले आणि येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
नागरिकांनी नगरसेवक आनंद चव्हाण आणि आ.अभय पाटील यांचा आभार मानलें आणि कौतुक केले. यावेळी वॉर्ड क्र.44 मधील भाजपचे कार्यकर्ते देवीदास जाधव, मंथन चौगले आणि इतर प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.