अनगोळ येथे येल्लुर मधील युवकाचा निघृण खून
बेळगाव:
येळ्ळूर येथील एका युवकाचा डोक्यात दगड किंवा एखाद्या हत्याराने प्राणघातक वार करून निघृण खून करण्यात आल्याची घटना अनगोळ तलावा शेजारील शेतवाडीमध्ये गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संजय तुकाराम पाटील (वय 34, रा. जिजामाता गल्ली, येळळूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून त्याला दारूचे व्यसन होते. मिळालेल्या माहितीनुसार संजय हा काल दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडला होता तो रात्रीपर्यंत घरी परतलाच नाही.
त्यानंतर गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह खूनझालेल्या अवस्थेत अनगोळ तलावा शेजारील शेतात आढळून आला. मृतदेह ज्या स्थितीत आढळला त्यावरून अज्ञात मारेकऱ्यांनी संजयच्या डोक्यात फावडा वगैरे सारख्या एखाद्या अवजाराने किंवा दगडाने जबर घाव घातला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे.