चिक्कोडी अंकली मार्गावर भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू
चिक्कोडी :
चिक्कोडी- अंकली मार्गावर दुचाकी आणि टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याचीघटना चिक्कोडी तालुक्यातील बसवनाळगड्डे जवळ मंगळवारी रात्री घडली. केरूर गावातील प्रशांत भैरू खोत (वय 22), सतीश कल्लाप्पा हिरेकोडी (23) आणि येलगौडा ,चंद्रकांत पाटील (22) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
चिक्कोडी – अंकली मार्गावरील बसवनाळगड्डे जवळ टेम्पो आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. हे युवक दुचाकीवरून चिक्कोडी येथून केरुरा गावाकडे जात असताना अपघात झाला. दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.